Showing posts with label neck pain. Show all posts
Showing posts with label neck pain. Show all posts

Thursday, 23 February 2017

Bone Care in the Reproductive Age: प्रजननक्षम वयात हाडांची काळजी

घरातील जवाबदारी स्वीकारल्यापासून गृहिणीला असंख्य कामे करावी लागतात. मात्र याच काळात हाडांची निगा राखण्याकडे दुर्लक्ष्य होतं.

स्त्रीला शक्ती चे रूप मानतात. आई, भगिनी, मुलगी अशा अनेक नात्यांमधून ती ते सिद्ध करते. या सर्वात कठीण नातं व काळ हा गृहिणीच्या स्वरूपाचा असतो. या काळात ती पती आणि मुलांकडे जास्त आणि स्वतःकडे सर्वात कमी लक्ष देते. परिणामी वाढते वय आणि जीवनशैलीचा तिच्या हाडांवर झालेला दुष्परिणाम दिसू लागतो. साधारणतः प्रजननक्षम वयात स्त्रियांच्या हाडातील रक्षण तिचे संप्रेरक (हॉरमोन्स) करतात. यात इस्ट्रोजनचा फार मोठा वाटा असतो. इस्ट्रोजन हाडांमधील कॅल्शियमची पातळी जोपासण्यास मदत करतो. अनियमित पाळीमुळे इस्ट्रोजनचे प्रमाण व हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊ शकते.


बर्याच गृहिणींचा गैरसमज असतो की घरातील कामे म्हणजेच व्यायाम. या कामांमुळे जरी थकवा जाणवत असला तरी हा व्यायाम नव्हे. म्हणूनच, गृहिणींना हाडे बळकट ठेवण्यासाठी योग्य आहार आणि उपयुक्त व्यायामाची गरज आहे. आजची स्त्री हि केवळ गृहिणी नसून नोकरी, व्यवसायही करते. ती सकाळपासून रात्रीपर्यंत काम करते व कुटुंबाला हातभार लावते. यातच, अनियमित जीवनशैली व कामाचा ताण यानेही हाडांची झीज होते.


कामाच्या ठिकाणी प्रसन्न मानसिकता हि हाडांच्या देखभालीसाठी आवश्यक असते. या व्यतिरिक्त कामाच्या स्वरूपानुसार, खास करून आय.टी. क्षेत्रातील स्त्रियांमध्ये, चुकीच्या पद्दतीने बसणे, वाकणे, वजन उचलणे या गोष्टी दिसतात. यामुळे स्नायूंवर व मणक्यांवर जास्त ताण येतो व कंबरदुखी आणि अंगदुखी सुरु होते. आजकाल तपासणीसाठी येणाऱ्या बऱ्याच स्त्रियांमध्ये स्थूलता, कंबरदुखी, अंगदुखी, गुडघेदुखी, थकवा, पाळीचा त्रास (पी.सी.ओ.डी.) आणि अनियमता अश्या बऱ्याच तक्रारी दिसतात. तसेच त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिन, केल्शियम व विटामिन डी ३ चे प्रमाणदेखील कमी मिळते.


ऑसटीओपोरोसीस, अर्थात हाडांचा ठीसुळपणा, सुद्धा या वयातील काळजीची बाब आहे. यात हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाण प्रचंड कमी होऊन माणके कोसळू शकतात अथवा हाडे मोडू शकतात. यात पारंपारिक उपवासाबरोबरच निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ व व्यायामाच्या अभावाचा भर पडतो. याच वयात स्त्री मातृत्वत सुद्धा प्रवाश करते. दुर्बल झालेल्या हाडांवर बाळाच्या पोषणाची जवाबदारी पडते. गर्भाशयात बाळाला पोषण आईच्या शरीरातून मिळते हे आपण जाणतोच. पण बाळाची हाडे सशक्त होण्यासाठी व त्यांची योग्य वाढ होण्यासाठी मातेच्या शरीरात कॅल्शियमची अतिशय आवश्यकता असते. खासकरून गरोदरपणातील शेवटच्या ३ महिन्यात बाळ प्रचंड प्रमाणात आईच्या शरीरातील कॅल्शियमवर अवलंबून असते, ज्यामुळे तिच्या हाडांची घनता आजून कमी होण्याची शक्यता असते.


सुदैवाने कॅल्शियमचा तुटवडा भरून काढता येतो. बाळाला स्तनपान करतांनाही आईच्या शरीराला कॅल्शियमची आवश्यकता असते. या काळात स्त्रीच्या शरीरातील साधारणतः ३ ते ५ टक्के कॅल्शियमचा साठा कमी होतो. त्यासाठी गरोदरपणात आणि स्तनपानाच्या काळात स्त्रियांना रोज १००० ते १३०० मि. ग्रा. कॅल्शियमचे सेवन करणे गरजेचे आहे. हा कॅल्शियमचा पुरवठा भाज्या, दुध, दही, राजगिरा आदी अन्नातून आणि कॅल्शियम व विटामिन डी च्या औषधातून मिळू शकतो. पण हि औषधे आपल्या प्रसुतितज्ञ अथवा अस्थिरोगतज्ञ यांच्या सल्ह्यानेच घ्यावीत.


याचबरोबर शरीरासाठी योग्य व्यायाम देखील आवश्यक आहे. व्यायामाआभावी कॅल्शियम हाडांपर्यंत न जाता लाघवीमार्फत बाहेर फेकले जाऊ शकते. साधारणतः स्नायू बळकट करण्याचे व्यायाम हाडांनाही बळकट करतात. यात सोपी योगासने, सूर्यनमस्कार, चालणे, सायकल चालवणे असे बरेच व्यायाम उपयोगी आहेत. मात्र जर हाडांची घनता कमी असेल तर फ़िजिओथेरेपिस्टच्या मार्गदर्शनाखालीच व्यायाम करावेत. यात प्रामुख्याने हाडांवर जोर येणेरे व्यायाम (वेट बेअरिंग व्यायाम) घेण्यात येतात ज्यामध्ये मोठ्या स्नायूंची ताकद वाढवण्याचे व्यायाम देखील असतात. यात मानेचे, कमरेचे, हातांचे, पायांचे तसेच मूत्रपिंड आणि गर्भाशयाला आधार देणाऱ्या स्नायूंचे (पेल्विक फ्लोर) व्यायाम देखील दिले जातात ज्यामुळे हाडे पुन्हा बळकट होऊ शकतात. पेल्विक फ्लोर व्यायामाने अवेळी होणाऱ्या ओलाव्याच्या त्रासापासून देखील मुक्ती मिळू शकते. तसेच उतार वयात पिशवी निसटण्याच्या आदी त्रासापासून देखील मुक्ती मिळू शकते. याचबरोबर वजनावर नियंत्रण ठेवणेही गरजेचे आहे. स्तुलतेमुळे पेल्विक फ्लोरचे, बीजकोशाचे, संप्रेरकांचे असे बरेच त्रास होऊ शकतात. उतार वयात यामुळेच कंबरेचे आणि गुढ्घ्याचे त्रास देखील होऊ शकतात. फ़िजिओथेरेपिस्ट आपल्याला स्तुलतेवर उपाय सांगतात व वजन नियंत्रित करण्याचे व्यायाम देखील करून घेतात. तसेच गरोदरपणात, प्रसुतीत आणि स्तनपानाच्या काळात शरीराची योग्य ठेवण याबद्दल भौतिकोपचार तज्ञांकडून मार्गदर्शन देखील दिले जाते. खास करून स्तनपान करतांना, दुपटी बदलतांना किव्वा बाळाला धरतांना आईने स्वतःची देखील कशी काळजी घ्यावी याबद्दल देखील मार्गदर्शन केले जाते.



या सर्व गोष्टींसोबत बसण्याची व कामे करण्याची योग्य पध्दती (एर्गोनोमिक्स), चांगली मानसिकता (पॉसिटीव विचारधारणा), ताणाचे (स्ट्रेस) नियोजन या सर्व गोष्टी देखील हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाच्या आहेत. म्हणूनच खऱ्या अर्थाने ‘शक्ती’ बनण्यासाठी स्त्रियांना कुटुंबासोबत स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करणेही महत्वाचे आहे.

Sunday, 11 December 2016

फिजिओथेरेपी, आजच्या आरोग्यासाठी काळाची संजीवनी....


फिजिओथेरेपी म्हणजे काय?

आपलं आरोग्य हे आपले सर्वोत्तम धन आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आणि व्यवसाय जोपासण्याच्या नादात आपण आपल्या ह्या आरोग्यस्वरूपी धनाकडे सर्वात जास्त दुर्लक्ष्य करत आहोत. या आरोग्याला जोपासण्यासाठी आधुनिक वैद्यकीय शास्त्राची एक सर्वोत्तम उपचार पध्दती म्हणजेच फिजिओथेरेपी. फिजिओथेरेपी म्हणजेच भौतिक उपचार. या विज्ञानात भौतिक शास्त्रातिल सिद्धांत मानवी शरीरासाठी योग्य रुपात वापरले जातात जेणेकरून सारीराची क्रीयापाद्दती सुधारून कार्यक्षमता वाढते. फिजिओथेरेपीस्ट हे एक वैद्यकीय तज्ञ असतात जे ह्या उपचार पद्धतीचा वापर करून रुग्णांना बरे करतात. तसेच सर्वसाधारण लोकांना सुद्धा व्यायामाचे महत्व आणि प्रकार दाखवून आजारांपासून दूर ठेवतात. भारतात देखील जागतिक पातळीवरील ज्ञानसंपन्न आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फिजिओथेरेपीस्ट आहेत.

विश्वभरात फिजिओथेरेपीचा उगम जरी १०० वर्षांपूर्वी झाला असला तरीही भारतात त्याला ६३ वर्ष झाली आहेत. १९५३ मध्ये मुंबईच्या के.ई.एम. रुग्णायालामध्ये भारतातील पहिले फिजिओथेरेपी कॉलेज सुरु झाले होते. आज भारतभर फिजिओथेरेपीच्या ३०० हून अधिक शिक्षण संस्था आहेत. आपल्या देशात फिजिओथेरेपी शिकण्यासाठी १२वी विज्ञानानंतरचा यु.जी.सी. आणि भारत सरकार आखीत ४ १/२ वर्षाचा फिजिओथेरेपी स्नातक (बी.पी.टी.) कोर्स आहे ज्यात शरीर रचना, शरीर क्रिया, शरीर कार्य, शस्त्रक्रिया, औषधशास्त्र, स्त्रीरोग आणि प्रसूती शास्त्र, अस्थिरोग शास्त्र, बालरोग शास्त्र, मज्जातंतू शास्त्र, हृदयरोग आणि श्वासनरोग शास्त्र आदी बरेच विषय असतात आणि या सर्व व्याधींवर कशा प्रकारे फिजिओथेरेपीने उपाय करावे हे वैज्ञानिक दृष्टीकोनातून आणि संशोधनातून शिकवलं जातं. तसेच फिजिओथेरेपी मास्टर्स (एम.पी.टी.) चा २ वर्षांचा पद्विउत्तर कोर्स आहे ज्यात ओर्थोपेडीक, न्युरोलोजी, कार्डीऑलॉजी आणि रेस्पीरेटरी, कम्युनिटी, स्पोर्ट्स फिजिओथेरेपी आदी विषयांचा समावेश असतो. तसेच फिजिओथेरेपी मध्ये डॉक्टरेट (पी.एच.डी.) सुद्धा करता येतं.

फिजिओथेरेपीस्ट आपल्या आरोग्याची काळजी २ प्रकारे घेतात. १. आपल्याला काहीही आजार किव्वा दुखापत होऊ नयेत म्हणून कशा प्रकारे काळजी घ्यावी, उत्तम स्वास्थ्यासाठी कोणकोणते, का आणि कशे व्यायाम करावेत, आपल्या शरीराची आणि सर्व अवयवांची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन करतात. २. किंबहुना काहीही इजा अथवा दुखापत झाल्यास ती कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत, स्नायू बरे होण्यासाठी कोणते इलाज करावेत, आखडलेल्या सांध्यांची कशी हालचाल करावी, शरीराची कार्यक्षमता कशी वाढवावी या सर्व गोष्टींबद्दल माहिती देतात आणि इलाज देखील करतात.

खरच, फिजिओथेरेपी म्हणजे २१व्या शतकाला मिळालेले एक वरदानच आहे. फिजिओथेरेपी मुळे आपल्याला नुसतेच आपले आयुष्याच नव्हे, तर त्याची गुणवत्ता देखील सुधरवता येते आणि नुसतेच आयुष्यातील वर्ष न वाढवता, त्या वर्षांमधील आयुष्य देखील जगता येतं.


फिजिओथेरेपीमधील प्रकार

फिजिओथेरेपीस्ट आपल्या स्वास्थ्यासाठी आणि आरोग्यासाठी विविध शारीरिक व्याधींवर इलाज करतात. यात प्रामुख्यानं हाडांसाठी, मेंदू आणि नासांसाठी (मज्जातंतू), हृदयासाठी, श्वासन आणि फुफुसंच्या कार्यासाठी, खेळांमधील दुखापातींसाठी, लहान मुलांसाठी, स्त्रियांसाठी, वर्धाक्यामधील त्रासांसाठी, काम करतांना होणाऱ्या त्रासांसाठी आणि सामाजिक आरोग्यासाठी अनेक उपाय योजना केल्या जातात.

१. ओर्थोपेडीक फिजिओथेरेपी: ह्यात सांध्यांची आणि मणक्याची झीज, उदा. संधिवात (आर्थ्रायटीस), स्पोंडीलायटीस, सायटिका, अपघात, सांधेरोपण, स्नायूंची आणि तंतूंची दुखापत, फ्रोजन शोल्डर अशा बऱ्याच व्याधींवर इलाज करतात. सर्वप्रथम रुग्णांचे दुखणे कमी करण्यासाठी विविध उपकरणांचा वापर केला जातो जेणेकरून रुग्ण दुखणे विरहित दैनंदिन काम आणि व्यायाम करू शकतात. तसेच स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी आणि सांध्यांची हालचाल राखण्यासाठी देखरेखीखाली नियमित ताकद वाढवण्याचे व्यायाम दिले जातात.

२. न्युरोलोजी फिजिओथेरेपी: ह्यात परालीसीस (अर्धांगवायू), अधरपक्ष्याघात, पर्किंसंस, स्मृतीभ्रम, मेंदूंचे विकार, सेरीब्रल पाल्सी, नसंचे विकार, अशा बऱ्याच व्याधींवर फिजिओथेरेपीस्ट इलाज करतात. अशा रुग्णांना बऱ्याच वेळी आपलं शरीर किव्वा त्याचा भाग हलवता येत नाही, अथवा हालचाल करण्यास त्रास होतो. या रुग्णांना फिजिओथेरेपीस्ट हालचाल करण्यास मदत करतात. यासाठी ते बऱ्याच उच्च दर्जाच्या नाविन्यपूर्ण प्रकारांचे तंत्र वापर करतात. यामध्ये शरीराच्या विविध भागांचा कसा वापर करावा, स्नायूंचा कडकपणा कसा कमी करावा, कमजोर स्नायू कसे हलवावेत, कमजोर स्नायुंना कसा आधार द्यावा या संबंधी मार्गदर्शन करतात.

३. कार्डीऑलॉजी आणि रेस्पीरेटरी फिजिओथेरेपी: हे फ़िजिओथेरपिस्ट हृदय विकाराचा झटका, बायपास शस्त्रक्रिया, हृदयात छिद्र, दमा, श्वासनाचे विकार, अशा बऱ्याच व्याधींवर फ़िजिओथेरपी द्वारे इलाज करतात. हे सर्व इलाज इतर डॉक्टरांच्या औषधोपचारा बरोबर करावे लागतात. तसेच श्वास आणि फुफुसंच्या कार्यासाठी आय.सी.यु. मध्ये आणि इतर वेळी देखील करण्याचे व्यायाम सांगितले जातात. या रुग्णांना प्रामुख्याने श्वास (दम) लागण्याचा त्रास होतो. त्यामुळे या रुग्णांना श्वासावर नियंत्रण ठेवण्याचे व्यायाम अत्यंत उपयोगी आहेत. याच बरोबर बर्गाड्यांची हालचालीचे व्यायाम, हृदयाची आणि फुफुसाची कार्यक्षमता वाढवण्याचे व्यायाम, उच्च रक्तदाब नियंत्रण करण्याचे व्यायाम शिकवले जातात.

४. स्पोर्ट्स फिजिओथेरेपी: यात खेळांमधील दुखापतींवर इलाज केले जातात. तसेच खेळाडूंना दुखापती होऊ नयेत म्हणून उपाय योजना सांगून खेळाडूंना अधिक कार्याक्ष्याम बनवले जाते. फ़िजिओथेरपिस्टचा क्रिकेट, भाला फेक, तबकडी फेक, शोर्ट पट, तसेच ‘कॉनटेक स्पोर्ट्स’ जसे रग्बी, सायकल, डायविंग, स्केटिंग, फुटबॉल, हॉकी, धावण्याची शर्यत, रेकेट स्पोर्ट्स, खोखो, कब्बडी अशा बऱ्याच खेळांमधे समावेश असतो. हाड मोडणे, सांधा निखळणे/ निसटणे आणि स्नायूंना (मास-पेशी, तंतू) सूज येणे किव्वा ते फाटणे या सर्व दुखापतींवर ते डॉक्टरांच्या बरोबर इलाज करतात. क्रीडाप्रकार आणि तीव्रतेनुसार खांदा, मनगट, हात, खुबा, गुडघा, घोटा आणि मणक्याला इजा होऊ शकते. स्पोर्ट्स फिजिओथेरेपीस्ट खेळाडूंच्या फिटनेस वर अधिक भर देतात ज्यात ताकद, स्टेमीना, लवचिकता आणि कौशल्य महत्वाचे घटक आहेत.

५. कम्युनिटी फिजिओथेरेपी: यात वार्धक्यातील त्रास, काम करतांना होणाऱ्या त्रास, पसूती मधील त्रास आणि सामाजिक आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी उपाय सांगितले जातात. तसेच गर्भावस्थेत करायचे व्यायाम, प्रसुतीनंतरचे व्यायाम, मधुमेह आणि स्थुलतेसाठीचे व्यायाम, काम करण्याच्या योग्य पध्दती (अर्गोनोमिक्स) आदी बाबत मार्गदर्शन केले जाते.



फिजिओथेरेपीमधील उपचार पध्दती

आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिजिओथेरेपीस्ट वेगवेगळ्या उपचार पद्दतींचा वापर करतात. यात प्रामुख्याने व्यायाम आणि इलेक्ट्रिक उपकरणे यांचा समावेश असतो. तसेच सांध्यांची कार्यक्षमता, स्नायूंची कार्यक्षमता, रोगनिदान आणि कार्यनिदानपद्धती वाढवण्यासाठी बऱ्याच अत्याधुनिक उपचारपध्दती सुद्धा वापरतात.

१. व्यायाम: हृदयाची, फुफुसांची आणि स्नायूंची गती आणि शक्ती वाढवणाऱ्या व्यायामाला एरोबिक व्यायाम म्हणतात. अशा व्यायामामध्ये हृदयाचे ठोके आणि श्वासाचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी वाढले पाहिजे आणि ते २० ते ३० मिनीटे करायला हवं. अशा व्यायामामुळे शरीराची कार्यक्षमता वाढते, म्हणजेच न थकता काम करता येण्याची शक्ती वाढते. 

ताकद म्हणजे कुठलीही क्रिया करण्याची स्थिती. ताकद वाढण्यासाठीच्या व्यायामाला अनएरोबिक व्यायाम म्हणतात. ह्यात वजन उचलणे, बैठका, जोर, सूर्यनमस्कार, आदी प्रकारांचा समावेश असतो. अशा प्रकारच्या व्यायामामुळे आपण अनेक कामे सहजतेने करू शकतो. ह्या व्यायामामुळे आपले स्नायू पिळदार व डौलदार दिसतात. 

दुखापत न होता आपल्या शरीराला कोणत्याही स्थितीत नेता येणे म्हणजेच लवचिकता. वयोमानाने व योग्य व्यायामाच्या अभावी स्नायू ताठरतात आणि त्यांची कार्यक्षमता कमी होते. ह्यामुळे आपल्याला इजा आणि दुखापत देखील होऊ शकते. लवचिकता राखण्यासाठी स्नायूंना ताण देण्याचे व्यायाम उपयुक्त आहेत. 

चपळता म्हणजेच कुशलता. कोणत्याही प्रसंगी योग्य आणि चटकन निर्णय घेणं. ह्यासाठी ताकद व लवचिकता ह्या दोघांची सांगड घालणे महत्वाची ठरते. स्थिरता व योग्य शरीर ठेवण म्हणजे सध्या स्तीतीत शरीराचे तोल सांभाळता येणे. 

फिजिओथेरेपीस्ट हे सर्व व्यायाम प्रकार रुग्णांकडून गरजेनुसार करून घेतात आणि त्यांचे आरोग्य आणि राहणीमान सुधारतात. या सर्व व्यायाम प्रकारांसाठी जिम बॉल, स्टेबीलीटी ट्रेनर, थेरा-बेंड, थेरा-ट्युब्स, टेप, हस्तोपचार पद्धती (मेनुअल थेरेपी) आणि ओर्थोसीस यांचा वापर केला जातो.

२. इलेक्ट्रिक उपकरणे: स्नायूंना आराम अथवा उत्तेजना मिळण्यासाठी, चालना मिळण्यासाठी, जखमा बऱ्या होण्यासाठी किव्वा दुखणे कमी होण्यासाठी विविध इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर केला जातो. यात अल्ट्रासाऊंड थेरपी, डायथरमी, टेन्स, आय.एफ.टी., ट्रेक्षन, लेजर, इंफ्रा रेड, विविध करंट ह्यांचा उपयोग केला जातो. अल्ट्रासाऊंड थेरपी, डायथरमी, लेजर आणि इंफ्रा रेड हि प्रामुख्याने शेक देण्याची उपकरणे आहेत. हि उपकरणे दुखापत कमी करून त्या भागाला लवकर बर होण्यास मदत करतात. टेन्स आणि  आय.एफ.टी. हे नसंचे दुखणे कमी करण्यास खूप उपयोगी आहेत. ट्रेक्षन हि उपचार पध्दती मानेला अथवा कमरेला देता येते. हि उपचार पध्दती दुखणे कमी करण्यास आणि स्नायूंची ताठरता कमी करण्यास मदत करते. विविध करंट चेतना नसलेल्या स्नायूंना पुन्हा हालचाल करण्यास आणि त्यांची कार्यक्षमता राखण्यास मदत करतात.


३. मेनुअल थेरेपी, निडलिंग, न्युरो टेकनिक आणि टेपिंग: या अत्याधुनिक उपचार पध्दती आहेत ज्यामध्ये फिजिओथेरेपीस्ट त्यांच्या हातांचा, सुईचा, टेपचा आणि इतर अवजारांचा वापर करून स्नायुंना आणि सांध्यांना चालना देऊ शकतात. तसेच या उपचार पद्दतींनी ताठर्लेल्या स्नायूंना आणि मासपेशींना सुद्धा चालना देता येते.

आपल्या शरीराची निगा ठेवण्यासाठी प्रत्येक अवयवांची देखील देखभाल खूप जरुरी आहे. आपल्या शरीरातील प्रमुख अवयव म्हणजे मेंदू, हृदय, फुफुस, पोटातील अवयव, स्नायू, हाडे आणि सांधे. फिजिओथेरेपीस्ट या सर्व उपचार पद्दतींचा वापर करून या सर्व अवयवांची कार्यक्षमता वाढविण्यास मदत करतात. व्यायामामुळे मेंदू ला उत्तम चालना मिळते, मस्तक व मनाला शांती आणि समाधान मिळत, हृदय आणि फुफुसाची कार्यक्षमता वाढते, शरीरात रक्तभिसारण वाढते, थकवा जाणवत नाही, पोटातील अवयव जसे जठर, आतड्या, मूत्रपिंड आदि यांचे विकार आणि निष्क्रीयता होत नाही, स्नायू, हाडे आणि सांधे ह्यांच्या आरोग्य आणि ताकद, लवचिकता आणि चपळता उत्तम राहते.



आजच्या राहणीमानातील चुका आणि फिजिओथेरेपी

आपण व्यायाम आपले स्वास्थ्य जपण्यासाठी करतो. आपण सर्वजण मानतो की आपले स्वास्थ्य चांगले आहे आणि आपण विकार विरहित आहोत. मुळात स्वास्थ्य म्हणजे काय हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. जागतिक स्वास्थ्य संस्था ह्यांच्या नुसार स्वास्थ्य म्हणजे परिपूर्णता. ही परिपूर्णता फक्त शारीरिक स्वास्थ्या मध्ये नसून मानसिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक स्वास्थ्या मध्ये देखील आहे. केवळ आपल्याला काही आजार नाही म्हणून आपले स्वास्थ्य उत्तम आहे असे म्हणून चालणार नाही.

आजच्या काळातील कित्येक आजार हे आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे आहेत. मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, संधीवात, मानसिक ताण, कर्करोग, कंबरदुखी असे अनेक आजार आज सामान्य झाले आहेत. आपण त्यांना आपल्या जीवनाचा घटक म्हणून मान्य देखील केले आहेत. पण खरी बाब ही आहे की हे सर्व आजार पूर्णपणी रोख्ण्यासारखे आहेत ज्यासाठी फिजिओथेरेपी आणि व्यायाम सर्वोत्तम गुरुमंत्र आहे. व्यायामामुळे आपल्या शरीराची कार्यक्षमता व क्रियाशक्ती वाढते. त्याच बरोबर आपली प्रतिकारशक्ती देखील वाढते. जर देशातील प्रत्येक कुटुंब स्वस्थ व निरोगी असेल तर नक्कीच आपल्या देशाची आर्थिक स्थिती देखील सुधारू शकेल. व्यायाम हा स्वास्थ्याच्या रक्षणाचा उत्तम मंत्र आहे. पण व्यायाम म्हणजे काय? आपल्या सर्वांमध्ये व्यायामाबद्दल बरेच समज/ गैरसमज आहेत. कोणतीही शारीरिक हालचाल जी आपले स्वास्थ्य व आरोग्य सुधारते ती व्यायाम होय. आपले शारीरिक आरोग्य हे अनेक घटकांनी बनलेले असते. पण ह्यामध्ये शरीराबरोबर मनाचे विकार देखील दूर व्हावेत हे सर्वात महत्त्वाचे आहे.

पुढचा प्रश्न येतो की आम्हाला व्यायाम करायला वेळ नाही, पैसा नाही आणि जागा देखील नाही!!!! पण खरं पाहता, व्यायामाला खरच एवढा वेळ, पैसा आणि जागा लागत नाही. आपल्या देशातील ऋषी मुनि हे वर्षानुवर्ष सूर्यनमस्कार करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यायचे. त्याच बरोबर त्यांचा आहार देखील साधा होता व वागणुक देखील सोज्वळ होती. पतंजलीची सूत्र सांगतात की मनाची शुद्धता फार महत्वाची असते. त्याच बरोबर सदवर्तन, चांगले चारित्र आणि चांगले विचार देखील महत्वाचे आहेत. अशी अनेक योगासने आहेत जी ६ x ६ च्या खोलीत देखील करता येतात. सूर्यनमस्कार एक असा परिपूर्ण व्यायाम आहे ज्याला काहीही वेळ आणि पैसा लागत नाही. संशोधन सांगत की दिवसाला कमीत कमी १२ ते २४ सूर्यनमस्कार देखील आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेसे आहेत. जसं एखादा वैमानिक विमान उडवण्या आधी विमानाचा प्रत्येक भाग तपासतो, तसेच आपण अंथरुणातून उठण्याआधी आपला प्रत्येक सांधा जरी हलवून पहिला तरी एक उपयुक्त व्यायाम ठरतो.

पण आपली आजची पिढी पाश्चात्य अनुकरणापायी आरोग्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहे. त्याच बरोबर जगण्याची स्पर्धा, कामाच्या ताणामुळे अथवा संगतीमुळे व्यसनाकडे देखील वळत आहेत. हे सर्व महत्वाचे प्रश्न मानवनिर्मित आहेत जे आज आपल्यालाच सोडवावे लागतील अन्यथा आपल्या सर्वांच्याच आरोग्यावर ह्याचे दुष्परिणाम दिसतील. व्यायाम हे एक असे सुव्यसन आहे ज्यामुळे आपण वाईट मार्गीदेखील कधीच जात नाही. आरोग्याच्या दृष्टीने आज आपल्याला मॉल्स ऐवजी बागांची जास्त गरज आहे, प्रदूषणापेक्षा स्वच्छ हवेची गरज आहे, औषधांपेक्षा व्यायामाची गरज आहे. नुसत्या आयुष्यापेक्षा सुंदर जीवनाची गरज आहे. ह्यासाठी फिजिओथेरेपीस्ट च्या मार्गदर्शनाखाली विविध व्यायाम आणि उपाययोजना शिकून आणि आजच्या जीवनशैलीतून होणारे बहुतेक से आजार रोखू शकतो आणि देशाला प्रगतीच्या मार्गाकडे नेऊ शकतो.



डॉ. अपूर्व शिंपी

कम्युनिटी फिजिओथेरेपीस्ट (एम.पी.टी.),

प्राध्यापक आणि कम्युनिटी फ़िजिओथेरपी विभाग प्रमुख,
संचेती हॉस्पिटल, पुणे

फ़िजिओ वन केअर फिजिओथेरेपी क्लिनिक,
मित्र मंडळ चौक, पर्वती, पुणे

Monday, 1 September 2014

Exercises on the Gym Ball

Workshop on ‘Exercises on the Gym Ball’

On 21st September 2014

The Gym Ball:
The Gym Ball, also known as Swiss ball, balance ball, body ball, fitness ball, gymnastic ball, physio ball, Pilates ball, Pezzi ball, sports ball, stability ball, Swedish ball, therapy ball and yoga ball, allows a wide range of exercises to be performed. This is a soft elastic ball with a diameter of approximately 35 to 85 cms (14 to 34 inches) and filled with air and used in physical therapy, athletic training, exercise and weight training.


The Gym ball was developed in 1963 by Aquilino Cosani, an Italian plastics manufacturer and since then has gained a wide role and application. From their development in clinical physical therapy setting, these balls and exercises are now used in athletic training, for general fitness routine and for alternative exercises in yoga and Pilates.

Benefits:
The Gym ball training exercises can be used to provide improvement in movements of the trunk, legs, arms & hands as well as to improve the strength and endurance (stamina) of abdominal muscles (core muscles), back muscles, legs (lower limb) & arms (upper limb) muscles and also to improve the flexibility and balance in patient population and in the general population as well. 
 
This is of extreme importance for sedentary individuals, physiotherapists, strength and conditioning specialists who can benefit from these training sessions with the Gym balls.

Along with the Gym ball is the new clinical tool used called as the BOSU ball. The BOSU ball (BOth Sides Utilised/ Used) is a semi-circular/ half gym ball which can be used for balance and stability training to a great extent. The flat surface can be up and used like a wobble board for balance training or the half ball can be up and used for balance and proprioceptive training. The body responds to the instability of the ball to remain balanced, engaging many more muscles which become stronger over time to keep it balanced and thus prove beneficial for exercise and fitness.

Choosing the right gym ball:
This varies on height and weight of the user. But a general rule is that when sitting on the ball, upper thighs should be parallel to the floor. Also there are specifications to the height-weight norms which need to be learned in the workshop.

Workout Area and Clothing: 
Should always be a comfortable airy space good enough to move around and should have a proper grip on the floor. Using good training shoes, comfortable and loose shirt/ T shirt and shorts is always advisable.

Who can benefit from the workshop:
This workshop can be conducted in two different parts:
a) For Physiotherapists (One day 8 hours’ workshop): Applicable from Final Year B.P.Th students onwards including practicing Physiotherapists and Sports Physiotherapists, covering the evidence based details of the gym ball and BOSU ball with a practical session on using the ball for treatment and rehabilitation of various conditions like back pain, knee pain, OA knee, arthroscopic surgeries of Knee, arthroscopic surgeries of Shoulder, Arthroplasty of Knee and Hip, neck pain, balance training (including safety measures), proprioceptive training, core muscles training, upper limb muscle training etc. Also a list of published references will be provided and discussed to enable the therapists to a self-directed learning initiative to be able to develop new additional techniques to be used in clinical practice.

b) For Fitness instructors, fitness enthusiasts and general population (One day 6 hours’ workshop): To learn the use of Gym ball for self/ client fitness enhancement in a scientific evidence based manner, including strengthening, stamina training, balance training, flexibility training for improving fitness.

Topics Covered in the Workshop:
·      Introduction to the Gym ball and BOSU ball
·      Benefits of Gym ball and BOSU ball exercises
·      Choosing the Right Gym Ball
·      Workout Area & Clothing
·      Ball Storage
·      Exercise on the Gym Ball Practical Sessions
a.       Abdominals and Core Muscles
b.      Back Muscles
c.       Legs
d.      Shoulder
e.       Arms
f.       Chest
g.      BOSU ball exercises

Course Conductor:
Apurv Shimpi
Masters in Physiotherapy in Sports Sciences and Community Health
Associate Professor and Head,
Dept of Community Health,
Sancheti Healthcare Academy, Pune

Registration Details:
Ms. Anjali Pradhan
Course Coordinator
Mob: 8888893944

Or visit:


A glimpse of the Workshop and Exercises done







Sunday, 22 June 2014

Old Age - Boon or Bane

वार्धक्य – शाप का वरदान


आयुष्यातील सेकण्ड इंनिंग खूप महत्वाची असते. आपल्या जीवनातील स्वतःसाठी सर्वाधिक वेळ आपण ह्याच वेळी देऊ शकतो. पण ह्या उतार वयातच आरोग्याचे सर्वाधिक त्रास देखील सुरु होतात. आपण कमावलेली सर्व शक्ती, धन व आरोग्य ह्या वेळी कमी होऊ लागते.

वाढत्या वयामध्ये शरीरात अनेक बदल होत असतात. वार्धक्या मध्ये आपल्या हाडांची वा सांधांची झीज होऊ लागते. हाडे ठिसूळ होऊन त्यामधील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. ह्याच बरोबर स्नायू व तंतू ताठरतात जेणेकरून त्यांना इजा होऊ शकते. त्याच बरोबर हृदय, नसा व फुफुसं देखील कमजोर होतात. हे सर्व बदल अनिवार्य आहेत. जशी जुन्या कार ला सर्विसिंग जास्त लागते, तशीच जुन्या झालेल्या शरीराला देखील मेंटेनन्स जास्त लागतं. योग्य आहार, विचार व जीवन शैली मुळे ह्याचे प्रमाण कमी करता येतं.

तब्येतीचे बरेच त्रास वार्धक्या मध्येच दिसतात कारण आपण कामातून निवृत्ती घेतो. कामाची सवय असणाऱ्या शरीराची हालचाल व गती कमी करतो. निवृत्तीचा खरा अर्थ म्हणजे कामातील बदल होय. पण दुर्दैवाने आपण निवृत्ती म्हणजे आराम असाच समझ करून घेतो जेणेकरून आरोग्य कमी होत जातं. वार्धक्याची तयारी ही पन्नाशीच्या आधी करायला हवी. आपल्या शरीराच्या  बँकची पुंजी तरुण वयातच वाढवायला हवी. म्हणूनच जो पर्यंत तुम्ही कामं करता तो पर्यंत तुम्ही सशक्त व निरोगी राहता.

वार्धक्या मधील होणारा सर्वात मोठा त्रास म्हणजे हाडांचे फ्राक्चर. ठिसूळ झालेली हाडे ही लवकर तुटू शकतात. जरा देखील जोर, मार किवा इजा ते सहन करू शकत नाहीत. याशिवाय वार्धक्या मध्ये तोल (Balance) कमी होत जातो. त्यामुळे पडून हाडांचे फ्राक्चर चे प्रमाण जास्त असते. अशा प्रकारे खुब्याचे हाड मोडलेले अनेक पेशंट हॉस्पिटल मधे येतात. खास करून बाथरूम मध्ये पाण्यावर घसरून पडण्याचे प्रमाण जास्त असते. काही लोकं कमोडवर बसतांना पाय घसरून पडतात व त्यांना इजा होते. आशा वेळी बाथरूम ची कडी लावली असल्यास कोणाची तत्परतेने मदत देखील घेता येत नाही. म्हणून जर तुम्ही घरात एकटे राहत असाल किवा केवळ आपला बायको/ नवऱ्या बरोबर असाल तर शक्यतो बाथरूम ची कडी न लावलेलीच बरी. जर बाथरूमच्या दारावरील हंड्ल जवळ अंधुक काच (Frosted Glass) लावली असेल तरी ती तोडून तातडीने मदत करता येईल. त्याच बरोबर कमोड शेजारी स्टील/ लोखंडी बार लावल्यास त्यांना धरून बसता / उठता येतं. 
जर डोळ्यांचा त्रास असेल तर चष्मा लावून वावरणे महत्वाचे आहे. त्याच बरोबर घरात पुरेसा उजेड असणे देखील आवश्यक आहे. खास करून जर रात्री उठाव लागत असेल तर जमिनीच्या पातळी वर दिवे बसवा जेणेकरून तोंडावर उजेड येणार नाही पण अंधारात चालता येईल. ह्याखेरीज कायम एक टोर्च जवळ ठेवावी.

पडून इजा होण्यासाठी जी दुसरी गोष्ट कारणीभूत आहे ती म्हणजे जिने. जिन्यावरून पडून, पाय मुरगळून इजा होण्याचे प्रमाण देखील जास्त आहे. ह्यासाठी जिन्याला देखील स्टील/ लोखंडी बार लावल्यास त्यांना धरून चढता/ उतरता येते. ह्याच बरोबर गरज पडल्यास काठी, वाकर, योग्य चपला वापराव्या. घरात कार्पेट वा उंबरठ्या वरून अडखळून पडण्याची भीती असते म्हणून शक्यतो ह्या गोष्टी घरात नाही ह्याची काळजी घ्यावी. जर नवीन घरात जाणार असाल तर सर्व खोल्या एकाच उंचीवर (equal level) आहेत हे तपासून घ्यावं.



नैराश्य हा वार्धक्यातील अटळ भाग व सर्वात मोठा शत्रू आहे. ह्याची करणे जरी अनेक असली तरी ह्याचा होणारा दुष्परिणाम अटळ आहे. ह्यामुळे आपल्या शरीरावर, मनावर व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम अनेक आहेत. म्हणून नैराश्या पासून जितकं लांब राहता येईल तितकं चांगलं. ह्याचा सर्वात चांगला मंत्र म्हणजे कधीही एकट राहू नका व चांगली मानसिकता ठेवा. मित्र मंडळी, किव्वा कुठल्या जोपासलेल्या आवडीत मन रमवावे. आपण जेवढे कामात गुंतलेलो राहू तितकाच आरोग्य चांगलं राहील. खास करून नातवंडानबरोबर खेळण्याचा आनंद हा वेगळाच असतो ज्याने मनाला फार हालके वाटते. उतारवयात सत्तात्याग करावा व कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेऊ नये. घराचा प्रमुख आपण नसून आपले पाल्य आहे हे मानावे. त्यांना प्रोत्साहन द्यावे, त्यांचे कौतुक करावे. सासू/ सासरे गिरी करू नये. दुसऱ्याच्या मनाचा विचार करा आणि त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. विरंगुळा होईल त्यात मन रमवावे. स्वतःची आड्गळ वाटू देऊ नका. सारख्या जुन्या आठवणी काढून भूतकाळात राहू नका आणि पुढचा पिढीला मागे खेचू नका. भविस्शाची वाटचाल करा. ह्याच बरोबर योग्य आर्थिक नियोजन करून ठेवा ज्यामुळे तुम्हाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.



व्यायाम हे वार्धक्यामधील उत्कृष्ठ औषध आहे. ह्या वयात साधारणत: दोन प्रकार चे व्यायाम करता येतात. १. स्थिरता व योग्य शरीर ठेवण (Posture & Stability Exercises), २. स्नायूंचा हालचाली चे व्यायाम (Mobility Exercises). ह्यात योग, प्राणायाम व हाडांवर वजन येणारे व्यायाम (Weight Bearing Exercises) महत्वाचे आहेत. खास करून धनुरासन, भुजंगासन, सर्पासन, मकरासन, मर्कटासन, अर्धाशालाभासन, पावन मुक्तासन, अनुलोम – विलोम, कपालभाती, भ्रमरी हे महत्वाचे व्यायाम आहेत. सूर्यनमस्कार व शाळेत शिकवलेले व्यायाम (PT exercises) हे सर्वोत्कृष्ट व्यायाम आहे. ह्या मुळे हृदय, स्नायू, सांधे व मस्तक ह्याला परिपूर्ण व्यायाम मिळतो. व्यायामा बरोबर पुरेशी झोप देखील महत्वाची असते. बर्याच लोकंना योग्य झोप न मिळाल्या मुळे चिडचिड होते व आरोग्यावर दुष्परिणाम होतो. रात्रीचे जेवण ७ – ७.३० लाच करावे व जेवल्या नंतर २ – २.३० तासाने झोपावे जेणेकरून चांगली निद्रा लागते.



जर कंबर दुखी, मानदुखी, पाठदुखी, गुढ्घेदुखी असेल तर अस्थीरोगतज्ञांकडून कॅल्शियम, विटामिन डी 3, विटामिन बी 12, Anti-Oxidants, सोया प्रोटीन, विटामिन बी कॉम्प्लेक्स इत्यादी औषधे घावीत. जर हाडे ठिसूळ झाली असतील तर सकाळचा कोवळ्या उन्हात व्यायाम करावा. सूर्य विटामिन डी चे उत्तम स्त्रोत आहे. ह्याच बरोबर भौतिकोपचारतज्ञांकडून नी ब्रेस, कंबरेचा ब्रेस (पट्टा) व योग्य व्यायाम शिकून घ्यावेत. खास करून गुढघ्या चे व मणक्या चे व्यायाम फार महत्वाचे आहेत. दिवसातून २ – ३ वेळा हे व्यायाम करावेत. शरीराच्या प्रत्येक सांध्याची हालचाल करावी व नियमित सर्व सांध्यांना तेल लावावं. तीळाच अथवा कोणतेही आयुर्वेदिक तेल ह्यासाठी उपयुक्त आहे. एखाद्या हास्य मंडळाचे सभासद व्हावे. हास्य हे सर्वात मोठे औषध आहे. म्हणूनच कायम हसा व सुखी राहा.

संसाराचा आघाडीवर आपण आता मागच्या खुर्चीवर आहोत हे जेव्हा आपण मान्य करतो व आपल्या अस्तित्वामुळे दुसर्याला आनंद देतो तोच क्षण मोलाचा ठरतो. जेव्हा आपल्याला ही बाब कळते व जेव्हा इतरांना आपण हवे हवेसे वाटतो तेव्हाच वार्धक्य हे वरदान ठरते.  

Dr. KH Sancheti
Dr. Apurv Shimpi (PT)